'लॉक ग्रिफिन' ते 'कॅम्प फायर' - एक 'धुंद स्वच्छंद' आनंदयात्रा
जर्मन डायरी १८ मे २०१५
वसंत वसंत लिमये उर्फ ' बाळ्या ' ह्या माणसाबरोबर खर तर मी दोनेक वर्षच काम केल असेल . हिमालयातील ऋषिकेश आणि सिक्कीमपासून ते तमिळनाडूतील एर्काटपर्यंत आणि विक्रमगड , दमण , सजन रिसोर्ट पासून ते गोमंतकापर्यंतच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात त्याच्याबरोबर डोंगरात फिरण्याचा अनुभव मला मिळाला हे माझ अहोभाग्य . हे काम करत असताना खूप शिकायला मिळाल अस म्हणण्यापेक्षा कधी कधी असा प्रश्न पडतो की '' शिकायला काय नाही मिळाल ?'' त्याच्या 'हाय प्लेसेस' ह्या संस्थेबरोबर केलेल्या ह्या देशभरातील भटकंती मधून / जी अनुभवांची शिदोरी मिळाली ती जगात कुठेही गेलो तरी आयुष्यभर पुरेल ह्याची खात्री आहे .डोंगरात फिरताना जी मित्रमंडळी इथे जोडली गेलीयेत आणि आठवणींच्या कुपीत साठवण्याजोगे जे विलक्षण अनुभव जगलोय ते तर ह्या सह्याद्रीचे आणि हिमाईचे अनंत उपकार .
आयआयटी यन , गिर्यारोहण क्षेत्रातील आम्हा सर्वांचा आदर्श , उत्तम कलाकार , सिद्धहस्त लेखक , एक यशस्वी व्यावसायिक म्हणून माहिती असलेल्या ' बाळ्याचा वर्तमानपत्रातील कोणताही लेख , ' धुंद स्वच्छंद ' सारख पुस्तक असो की ' लॉकग्रिफिन सारखी भन्नाट ' कादंबरी ह्या गोष्टी केवळ ' पुस्तकाच्या कपाटाच्या कप्प्यात नव्हे तर आमच्या हृदयाच्या कप्प्यात ठाण मांडून बसलेल्या आहेत . अशा ह्या हरहुन्नरी अवलियाचं नवीन पुस्तक येऊ घातलंय ग्रंथाली प्रकाशनातर्फे . त्याचे अनुभव आपल्या जाणीवा कल्पनेपलीकडे समृद्ध करतील ह्याची खात्री आहे . कोकण कड्याच्या पहिल्या यशस्वी चढाई पासून ते एक दोन नाही तर हिमालयातील तब्बल सोळा हिमशिखरांच्या मोहिमांचा अनुभव असलेला ह्या माणसाने 'माणस' घडवायचं काम केलय ते वेगळच .
त्याचं पुस्तकही त्याच्या नावासारखच एकदम आगळवेगळ 'कॅम्प फायर' …. ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा दिवस २९ मे हा त्यान त्यानं आणि त्याच्या प्रकाशकांनी विचार करून निवडला असणार हे निश्चित . .
पृथ्वीच्या तिसरया ध्रुवावर मानवाचं पाऊल ह्याच दिवशी १९५३ साली पडलं होत … तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी ह्यांनी जेव्हा पृथ्वीतलावरचं सर्वोच्च शिखर सागरमाथा अर्थात माउंट एव्हरेस्ट सर केल तेव्हा .
जो माणूस तब्बल चव्वेचाळीस वर्ष ह्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवून डोंगराएवढ काम करून ठेवतो त्याच्या पुस्तकाला आणि त्याच्या विचारांना डोंगरा एवढी प्रसिद्धी देण हे आता माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य मराठी वाचकाचं काम आहे .
पुण्यातील माझ्या सर्व मित्र मंडळीना आणि त्यातूनही ' गिर्यारोहण , पदभ्रमण , भटकंती , साहस ह्या क्षेत्रातील मित्र मंडळीना नम्र आवाहन , विनंती आणि तंबी … २९ मेचा कार्यक्रम चुकवायचा विचार मनातही आणू नका .
II शुभम भवतु II
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वसंत लिमये ह्याचं अजून एक पुस्तक
जर्मन डायरी
- मु. पो . बर्लिन ऑगष्ट २०१२
मित्रवर्य (आणि खरे तर गुरूवर्य) वसंत वसंत लिमये ह्यांच्या 'लॉक ग्रिफिन' ह्या मराठी कादंबरीवरचा माझा अभिप्राय माझ्या शब्दात
(वेळ आणि इच्छा असेल तर जरूर वाचणे )
प्रिय बाळ्या, सध्या युरोपात सुट्टीचा हंगाम आहे ... त्यामुळे ठरवलं की ह्या कादंबरीच्या नायकाला तुझ्या 'भद्राला' तो अमेरिकेत जायच्या आधी आमचं 'फ्रँकफर्ट ' दाखवावं...
प्रिय बाळ्या, सध्या युरोपात सुट्टीचा हंगाम आहे ... त्यामुळे ठरवलं की ह्या कादंबरीच्या नायकाला तुझ्या 'भद्राला' तो अमेरिकेत जायच्या आधी आमचं 'फ्रँकफर्ट ' दाखवावं...
एयरपोर्ट वरून त्याला सकाळी उचललं आणि तडक 'युरोटौवर(European Central Bank ) गाठलं आणि पुढच्या आठ तासात त्यानं मला डोंबिवली ,नासिक आणि दिल्लीच्या कॅनौट प्लेस पासून कुमाऊ हिमालयापर्यंत आणि आणि लुईस मौंटन कॅम्प साईट अमेरिकेपासून पार आईसलंड, लंडन आणि परत दिल्लीपर्यंत असं काही फिरवलं की संध्याकाळी डोक गरगरायला लागल आणि मी 'लॉक ग्रिफिन' ग्रस्त झालो ... आणि श्रावणात जे करायची इच्छा नव्हती तेच करायला लागल .
असो , . ...तुझ्या अगाध आणि अचाट निरीक्षण शक्तीला सलाम ! ज्या बारकाईने तू तपशील मांडले आहेस त्याला तोड नाही .... त्याच त्या 'ललित , प्रवासवर्णन , प्रेमकथा , ऐतिहासिक , इंग्रजीचे अनुवाद आणि भाषांतर ' अश्या मिळमिळीत आणि चाकोरीबद्ध साहित्यामुळे , माझ्यासारख्या सामान्य मराठी वाचकांमध्ये आलेली मरगळ , तुझ्या 'लॉक ग्रिफिन' कादंबरी ने झटकून टाकली आहे .... रहस्यमय इंग्रजी कथांना लाजवेल असा ' थ्रील्लर सस्पेन्स ' ह्या मराठी कादंबरीत आहे ...आणि ती खरोखर वैश्विक कादंबरी झाली आहे .
माझ्या यथातथा इंग्रजी भाषेत माझ्या युरोपातल्या मित्र -मैत्रीणीना मी ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ... पण त्यांनी तुलाच उलटा निरोप धाडला आहे , की लवकरच ह्याच इंग्रजी भाषांतर हवंय ! आणि हो , तुझ्या पुढच्या कादंबारीचा चा नायक मात्र युरोपात आला पाहिजे ....त्याला काही लागेल ती मदत आपण करू . -
परत एकदा धन्यवाद ,
अजित रानडे
मराठी कट्टा फ्रँकफर्ट , जर्मनी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा