ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं
जून २०१२
जर्मन डायरी
अख्ख्या युरोपला सध्या फुटबॉल ज्वरानं ग्रासलय ! फ्रॅंकफर्ट स्टेशन जवळच्या " ओरिलीज" पबमध्ये प्रचंड मोठ्या स्क्रीनवर " जर्मनी - डेन्मार्क' पहात होतो .. रंगीबेरंगी वेश परिधान केलेल्या तरुण तरुणींचा सळसळता उत्साह, मद्याचे हिंकाळणारे चषक,जोरदार शिट्ट्या, प्रचंड गोंगाट ह्यांनी वातावरण भारून गेलंय !
आणि ह्याच वेळी सर्वांपासून थोडा दूर कोपऱ्यात एक पन्नाशीचा माणूस दिसला ...'देसी ' होता हे नक्कीच .. बहुधा पाकिस्तानी असावा ...त्याच्या डोळ्यात पाणी दिसत होत .....काही विचारण्याच्या आधीच त्यान त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला ...... त्यावर गाणे चालू होत ....... " ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं...मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा" .
आजूबाजूला चाललेल्या त्या प्रचंड गोंगाटात सुद्धा , मेहेदी हसन साहेबांचा तो स्वर्गीय आवाज मी अचूक ओळखू शकलो ... एकापेक्षा एक सरस आणि अवीट गोडीच्या गझलानी संगीतरसिकांवर पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे गझलसम्राट मेहदी हसन साहेब नुकतेच गेले ....आणि भारत आणि पाकिस्तान ह्यांना सांधणारा शेवटचा अत्यंत महत्वाचा दुवा नाहीसा झाला ! जगजीत सिंह ,सुरेश भट आणि आता साक्षात मेहेंदी हसन साहेब आपल्यात नाही आहेत ....आणि 'गझल' खरोखर पोरकी झालीय ! ह्या गझल सम्राटाला मानाचा मुजरा !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा