पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका 'सैराट' मित्राशी झालेली पहिली भेट

इमेज
  #MajhiGermanDiary                                                 November 7th, 2014 Met ' Nagaraj Manjule' - the award-Winning Marathi Director of the best Marathi Film Fandry 'फॅंड्री  स्थळ -फ्रँकफर्ट एअर पोर्ट दमट हवेचा एक ढगाळ दिवस फ्रँकफर्ट सारख्या बहुभाषिक आणि बहुढंगी शहरात राहायला लागून मला बघता बघता तीन वर्षं झालीयेत ह्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता . एअर पोर्टच्या लॉबी मध्ये बसून ब्लॅक कफेचे घोट घेत समोर दिणाऱ्या डाऊन टाऊन मधल्या गगनचुंबी इमारती न्याहाळत गेल्या तीन वर्षांचा लेखाजोगा मनात मांडत होतो . लॅंडिंग करणार् ‍ या विमानांच्या चाकांचा धावपट्टीवर उतरताना होणार् ‍ या घर्षणाचा … आणि पल्याडला चाललेल्या विमानांच्या टेक ओफ चा हमिंग साउंड मंदपणे का होईना पण कानावर नक्की आदळत होता . पण मनात , डोक्यात आणि काळजात एक वेगळच संगीत वाजत होत … ह्या वर्षाच्या सुरुवातीपासून ऐकत असलेल्या 'फॅंड्री' ह्या मराठी चित्रपटाच्या थीम सॉंगच .. जीव झाला येडापीसा रात रात ज...