चार्ली चॅप्लिन , स्विझर्लंड आणि माझा माऊथ ऑर्गन
#HarmonicaofaWanderer #MajhiGermanDiary #charliechaplin मागच्या आठवड्यातल्या गुरुवारची गोष्ट . Block chain , Augmented reality , connected consumer आणि Digital Initiatives ह्या विषयांवर त्या स्विस कस्टमर टीमबरोबर दिवसभर काथ्याकूट करून झालाय .... ह्या वर्षाच्या शेवटच्या quarter ची सेल्स प्रोजेक्शन्स आणि धंदा आणायचं आणि नंबर्सच टार्गेट complete करण्यासाठीचं प्रेशर आणि गेले तीन दिवस रात्रंदिवस चाललेलं काम ह्यामुळं डोक्याचा नुसता भुगा झालाय.... स्वतःची बायको , आपलाच कस्टमर आणि आपल्याच स्वतःच्या टीम मधले काम न करणारे लोक ह्यांच्याशी हुज्जत घालून , फायदा तर शून्य होतो आणि वर आपलंच ब्लड प्रेशर वाढतं हे , वयाच्या चाळीशीत का होईना , पण स्वतःला समजावत दिवसातली शेवटची कॉफी ढोसतोय . 🙂 आणि कॉफीचा शेवटचा सीप घेताना लक्षात येतंय की गेले तीन दिवस आपण जिनिव्हा लेकच्या ह्या अतिशय रमणीय आणि आप्लसच्या कुशीतल्या गावात रहातोय हे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत पुढच्या पाच मिनिटात ऑफिसच्याच अवतारात तडक , फ्रांस बॉर्डर ला खेटून असलेल्या स्विझर्लंडच्या त्या छोट...