आज खरं तर कामात बिलकुल लक्ष लागत नव्हतं . MARKLUEGASTमधली कस्टमर मीटिंग संपवून KULMBACH च्या त्या निर्जन स्टेशनवर पोहोचलो . दुपारची साडेचारची वेळ असली तरी अंधारून यायला सुरुवात झाली होती आणि थंडी चांगलीच 'मी' म्हणत होती . टाइम टेबल पाहिलं तर FRANKFURT च्या ट्रेनला तब्बल तासाभराचा वेळ होता . स्टेशनच्या बाहेर आलो . आसपास पाहिलं तर जवळच्या एका बिस्तरॉमध्ये दोन चार म्हातारे हेलन फिशरच गाणं लावून बेसुरे गात होते ... मला बघून त्यांच्या हातातल्या बाटल्या उंचावत हॅलो असं ओरडले .जर्मनीमधल्या आणि त्यातही मध्य पूर्व जर्मनीच्या अशा खेड्यापाड्यात, गोरीकातडी नसलेला माणूस दिसला हे साले त्याच्याकडे तो चंद्रावरून आलाय की काय अशा नजरेनं बघतात . गेल्या पाच वर्षात अशा नजरांना मी चांगलाच सरावलोय . मीही त्यांच्याकडे काहीसं दुर्लक्ष करत शेजारच्या बेकरीत शिरलो . फेसबुक उघडून उजवीकडच्या today's birthdays कड नजर टाकली . .. तिचा बर्थडे दिसतो का ते पाहिल...