स्मृतिगंध
स्मृतिगंध काही दिवसांपूर्वीच , जर्मनीतल्या एका छोट्या शहरातील विद्यापीठात जाण्याचा योग आला . निमित्त होतं ते आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या , एका विद्यार्थिनीला PhD मिळाल्याचं . तिनं तिचे PhD चे गाईड आणि अजून काही वर्गमित्रमैत्रिणींना एका छोट्या पार्टीसाठी बोलावलं होत . ह्या कार्यक्रमासाठी भारतातून तिचे कोणीही कुटुंबीय येऊ शकणार नसल्याने , ( Local Guardian ) म्हणून मलासुद्धा ह्या कार्यक्रमाला बोलावलं होतं . हा छोटेखानी कार्यक्रम तिच्याच कॉलेजच्या कॅंटीनमध्ये होता . त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या कॉलजच्या कॅम्पस मध्ये जाण्याचा योग येत होता . तिथलं ते सुंदर शैक्षणिक वातावरण , शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची एकमेकांबद्दल असलेली आपुलकी आणि बोलण्यातला तितकाच सहजपणा बघून खूप छान वाटलं ... आणि नकळतपणे माझ्याही डोळ्यांसमोर अकरावी बारावीचे दिवस येऊ लागले . एम डी विद्यालयातून दहावी झाल्यानंतर , अर्जुननगरला कॉलेजला प्रवेश घेतल्यावर , आपण काही खूप वेगळ्या विश्वात आलोय असं मला कधीच वाटलं नव