पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतिगंध

इमेज
                                                               स्मृतिगंध काही दिवसांपूर्वीच , जर्मनीतल्या एका छोट्या शहरातील विद्यापीठात जाण्याचा योग आला . निमित्त होतं   ते आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या ,  एका विद्यार्थिनीला PhD मिळाल्याचं . तिनं   तिचे PhD  चे गाईड  आणि अजून काही वर्गमित्रमैत्रिणींना एका छोट्या पार्टीसाठी  बोलावलं होत . ह्या कार्यक्रमासाठी भारतातून तिचे  कोणीही  कुटुंबीय  येऊ शकणार नसल्याने , ( Local Guardian )  म्हणून  मलासुद्धा ह्या  कार्यक्रमाला बोलावलं होतं . हा छोटेखानी कार्यक्रम तिच्याच कॉलेजच्या कॅंटीनमध्ये होता . त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या कॉलजच्या कॅम्पस मध्ये जाण्याचा योग  येत होता . तिथलं ते सुंदर शैक्षणिक वातावरण , शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची एकमेकांबद्दल  असलेली आपुलकी आणि...

चार्ली चॅप्लिन , स्विझर्लंड आणि माझा माऊथ ऑर्गन

#HarmonicaofaWanderer #MajhiGermanDiary #charliechaplin  मागच्या आठवड्यातल्या गुरुवारची गोष्ट .  Block chain , Augmented reality , connected consumer आणि Digital Initiatives ह्या विषयांवर त्या स्विस कस्टमर टीमबरोबर दिवसभर काथ्याकूट करून झालाय ....  ह्या वर्षाच्या शेवटच्या quarter ची सेल्स प्रोजेक्शन्स आणि धंदा आणायचं आणि नंबर्सच टार्गेट complete करण्यासाठीचं प्रेशर आणि गेले तीन दिवस रात्रंदिवस चाललेलं काम ह्यामुळं डोक्याचा नुसता भुगा झालाय....  स्वतःची बायको , आपलाच कस्टमर आणि आपल्याच स्वतःच्या टीम मधले काम न करणारे लोक ह्यांच्याशी हुज्जत घालून , फायदा तर शून्य होतो आणि वर आपलंच ब्लड प्रेशर वाढतं हे , वयाच्या चाळीशीत का होईना , पण स्वतःला समजावत दिवसातली शेवटची कॉफी ढोसतोय .  🙂 आणि कॉफीचा शेवटचा सीप घेताना लक्षात येतंय की गेले तीन दिवस आपण जिनिव्हा लेकच्या ह्या अतिशय रमणीय आणि आप्लसच्या कुशीतल्या गावात रहातोय हे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत  पुढच्या पाच मिनिटात ऑफिसच्याच अवतारात तडक , फ्रांस बॉर्डर ला खेटून असलेल्या स्विझर्लंडच्या त्या छोट...

जर्मनीमध्ये भेटलेल्या जपानी आज्या

इमेज
# majhigermandiary   # Salesstories पोर्शे झेन्ट्रुम (Porsche Zentrum ) च्या त्या चकचकीत आणि पॉश R &D सेंटरमधून बाहेर पडताना त्या मक्ख चेहऱ्याच्या प्रोक्युरमेन्ट च्या दोन मॅनेजर्सशी हस्तांदोलन केलं .. आणि झपाझप स्टेशन कडे चालायला लागलो . डोक्यात विचारांचं वादळ थैमान घालत होतं .... असंख्य प्रश्नांच्या जंजाळात पूर्णपणे गुंतलोय असं वाटायला लागलं ... काय चुकलंय हेच कळतं नव्हतं ... तोंडाशी आलेला घास कुणीतरी शेवटच्या क्षणी पळवलाय असं वाटत होत .. युरोप मध्ये गेल्या सात वर्षात सेल्स पर्सन म्हणून काम करत असताना , कस्टमर कडून अगदी शेवटच्या क्षणाला .... ' सॉरी , आम्ही दुसरा पार्टनर सीलेक्ट केलाय आणि त्यांच्याबरोबर काम सुरु करत आहोत ' ..हे ऐकणं माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हतं ..... पण , नवीन धंदा मिळवण्यासाठी ,जिथे गेले सहा महिने दिवसरात्र राबलो .. तिथेआपल्याला नाकारण्यात आलंय हे सत्य पचवणं जरा अवघड जात होत .. आमच्याच कंपनीची बंगलोर आणि चेन्नई मधली काही मंडळी माझी फजिती व्हायची वाटच बघत असणार याची खात्री होती ,...कारण युरोपात राहणारा भारतीय कंपनीचा सेल्स मॅनेजर , म्हणजे कंप...