पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जर्मनीमध्ये भेटलेल्या जपानी आज्या

इमेज
# majhigermandiary   # Salesstories पोर्शे झेन्ट्रुम (Porsche Zentrum ) च्या त्या चकचकीत आणि पॉश R &D सेंटरमधून बाहेर पडताना त्या मक्ख चेहऱ्याच्या प्रोक्युरमेन्ट च्या दोन मॅनेजर्सशी हस्तांदोलन केलं .. आणि झपाझप स्टेशन कडे चालायला लागलो . डोक्यात विचारांचं वादळ थैमान घालत होतं .... असंख्य प्रश्नांच्या जंजाळात पूर्णपणे गुंतलोय असं वाटायला लागलं ... काय चुकलंय हेच कळतं नव्हतं ... तोंडाशी आलेला घास कुणीतरी शेवटच्या क्षणी पळवलाय असं वाटत होत .. युरोप मध्ये गेल्या सात वर्षात सेल्स पर्सन म्हणून काम करत असताना , कस्टमर कडून अगदी शेवटच्या क्षणाला .... ' सॉरी , आम्ही दुसरा पार्टनर सीलेक्ट केलाय आणि त्यांच्याबरोबर काम सुरु करत आहोत ' ..हे ऐकणं माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हतं ..... पण , नवीन धंदा मिळवण्यासाठी ,जिथे गेले सहा महिने दिवसरात्र राबलो .. तिथेआपल्याला नाकारण्यात आलंय हे सत्य पचवणं जरा अवघड जात होत .. आमच्याच कंपनीची बंगलोर आणि चेन्नई मधली काही मंडळी माझी फजिती व्हायची वाटच बघत असणार याची खात्री होती ,...कारण युरोपात राहणारा भारतीय कंपनीचा सेल्स मॅनेजर , म्हणजे कंप...