पोस्ट्स

जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेग्झिटचे जर्मनीतील पडसाद

इमेज
 ′ जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहराच्या परिसरात ३०००० नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार...   फ्रँकफर्टमधील जागेचे भाव गगनाला भिडणार...   ‘ब्रेग्झिट’नंतर युरोपची आर्थिक राजधानी असं  बिरुद मिरविणाऱ्या लंडन कडून  ते स्थान फ्रँकफर्ट किंवा पॅरिस हिसकावून घेणार ..... ‘ब्रेग्झिट’वरचे निरनिराळे विनोद      ..... जर्मनीतील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या  ′मराठी कट्टा जर्मनीच्या ′ व्हाटसअप   ग्रुपवर  २४ जूनच्या दुपारपासून अशा संदेशांची देवाणघेवाण  जोरात सुरू सुरू झाली .  खरं तर आपण , आपला  नोकरीधंदा  , आपलं कुटुंब , सुट्टीच्या काळात आलेले बऱ्याच जणांचे आईवडील आणि त्यांच्याबरोबर युरोपात फिरण्याचे प्लॅन्स , मुलांना असलेल्या  शाळांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातल्या आपापल्या गावी जाण्याची लगबग आणि त्याच नियोजन ह्यात गुंतलेल्या जर्मनीतील मराठीजनांना हे ‘ब्रेग्झिट’ प्रकरण काय आहे  हे जाणून घायची उत्सुकता प्रकर्षाने जा...