पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'हिमालप्सह्याद्री' डोंगरयात्रा क्रमांक २/ HimAlpSahyadri Mountain Visit 2

इमेज
'हिमालप्सह्याद्री' ... म्हणजे  शिवाजी महाराजांबरोबर ( with the statue of Maharaj)  युरोपातले काही डोंगर चढून जाण्याचा उपक्रम ११ डिसेंबर  २०१७ (International Mountain Day)  पासून   सुरु केला आहे   ... आपल्या सर्वांच्या पाठींब्यासाठी धन्यवाद .  हिमालप्सह्याद्री' मधील दुसरी डोंगरयात्रा नुकतीच केली त्याबद्दल थोडंसं ... अधिक वेळ मिळाल्यास विस्ताराने लिहायचा नक्की प्रयत्न करेन .  युरोपात गेली सहा वर्ष राहत असताना साल्झबुर्ग  ह्या जर्मनीतल्या   बव्हेरीया ह्या प्रांताला    खेटून असलेल्या नितांतसुंदर  शहरात जाण्याचा कैक वेळा  योग आला होता .   इथे आलं  की असं वाटत की ... जणू काही जगप्रसिद्ध  संगीतकार मोझार्टच्या   Eine Kleine Nachtmusick  च्या सुरावटी   वातावरणात  भरून   राहिल्या आहेत .. आणि   युनेस्को हेरिटेज  म्हणून घोषित केलेल्या ह्या इतिहासप्रसिद्ध शहरा च्या   कोपऱ्याकोपऱ्यात...