पोस्ट्स

भिंतीवरच्या फोटोतल्या सुखद आठवणी

इमेज
आज खरं  तर  कामात बिलकुल लक्ष लागत नव्हतं .  MARKLUEGASTमधली कस्टमर मीटिंग संपवून   KULMBACH च्या त्या निर्जन स्टेशनवर पोहोचलो . दुपारची  साडेचारची  वेळ असली तरी अंधारून यायला सुरुवात झाली होती आणि थंडी चांगलीच 'मी' म्हणत होती . टाइम टेबल पाहिलं तर FRANKFURT च्या ट्रेनला तब्बल तासाभराचा वेळ होता .   स्टेशनच्या बाहेर आलो . आसपास पाहिलं तर जवळच्या एका बिस्तरॉमध्ये दोन चार म्हातारे  हेलन फिशरच गाणं  लावून बेसुरे गात  होते ... मला बघून त्यांच्या हातातल्या बाटल्या उंचावत  हॅलो असं ओरडले .जर्मनीमधल्या आणि त्यातही मध्य पूर्व जर्मनीच्या अशा खेड्यापाड्यात,    गोरीकातडी नसलेला माणूस दिसला हे साले त्याच्याकडे   तो चंद्रावरून आलाय की काय अशा नजरेनं बघतात .  गेल्या पाच वर्षात अशा नजरांना  मी चांगलाच सरावलोय .  मीही त्यांच्याकडे काहीसं  दुर्लक्ष करत शेजारच्या बेकरीत शिरलो  .  फेसबुक उघडून उजवीकडच्या  today's birthdays कड  नजर टाकली . .. तिचा बर्थडे दिसतो का ते पाहिल...

जालिम तूने तो कमाल कर दिया

इमेज
                                                जालिम तूने तो कमाल कर दिया २९ डिसेंबर  १९९६ …  पुण्यातली एक रम्य संध्याकाळ … आणि त्यातही बहुधा रविवार .  खर तर  गुलाबी थंडीतल्या अशा रम्य वेळी  ,  पुण्यात येऊन फारशी वर्षं   न लोटलेल्या माझ्यासारख्या होस्टेल वासियांचे थवे , डेक्कन किंवा कॅम्पवर प्रेक्षणीय स्थळं  शोधत रेंगाळत असतात … पण आज सकाळीच वर्तमानपत्रात वाचलेल्या त्या निवेदनाने  मला थेट गरवारे कॉलेजच्या  सभागृहात पोहोचवलंय .  संध्याकाळचा सहाचा सुमार , गरवारेच प्रशस्त सभागृह , तरुणाईचा वावर तसा थोडा कमीच दिसतोय , …  , पण वातावरणात  एक मंद सुगंध दाटून राहिलाय , सगळ कस प्रसन्न वाटतंय , मधूनच  हास्याची कारंजी फुलताहेत , आज अनेक नव्या जुन्या साहित्यिकांची वर्दळ दिसतीये इथे … जणू काही मराठी स...

ब्रेग्झिटचे जर्मनीतील पडसाद

इमेज
 ′ जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहराच्या परिसरात ३०००० नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार...   फ्रँकफर्टमधील जागेचे भाव गगनाला भिडणार...   ‘ब्रेग्झिट’नंतर युरोपची आर्थिक राजधानी असं  बिरुद मिरविणाऱ्या लंडन कडून  ते स्थान फ्रँकफर्ट किंवा पॅरिस हिसकावून घेणार ..... ‘ब्रेग्झिट’वरचे निरनिराळे विनोद      ..... जर्मनीतील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या  ′मराठी कट्टा जर्मनीच्या ′ व्हाटसअप   ग्रुपवर  २४ जूनच्या दुपारपासून अशा संदेशांची देवाणघेवाण  जोरात सुरू सुरू झाली .  खरं तर आपण , आपला  नोकरीधंदा  , आपलं कुटुंब , सुट्टीच्या काळात आलेले बऱ्याच जणांचे आईवडील आणि त्यांच्याबरोबर युरोपात फिरण्याचे प्लॅन्स , मुलांना असलेल्या  शाळांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातल्या आपापल्या गावी जाण्याची लगबग आणि त्याच नियोजन ह्यात गुंतलेल्या जर्मनीतील मराठीजनांना हे ‘ब्रेग्झिट’ प्रकरण काय आहे  हे जाणून घायची उत्सुकता प्रकर्षाने जा...

आयुष्याचा सांगाती , "राजा शिवछत्रपति"

इमेज
                                                                      जर्मन डायरी  श्रावण शुद्ध पंचमी शके १९३७                                                                                                  १९ ऑगस्ट  २०१५ तशी  गोष्ट काही  फारा वर्षांपूर्वीची नाही .  ...

एका गिर्यारोहकाचे 'सुजाण ' डोंगरवेड

इमेज
                                                                                                                                                                       ...